तुम बिन सात दिन
तुम बिन सात दिन * प्रा जयराम भिडे * रविवार म्हणजे रिलॅक्स वार . आज फिरण्यास दांडी मारत सकाळी निवांत उठलो . सवयी प्रमाणे मोबाईल हातात घेऊन दिवसाची सुरवात झाली . लहानपणी दिवस सुरू होई तो , " कराग्रे वसते लक्ष्मीः " या सुभाषिताने . जसा जसा मोठा होत गेलो तशी सुभाषितांची जागा चित्रपटांच्या गाण्याने घेतली . आता तर गेल्या दहा वर्षात दिवसाची सुरवातआधुनिक सुभाषित कृतीत आणून होते . कराग्रे वसते टच स्क्रीन | करमध्ये मोबाईल। करमूले तु चार्जर | प्रभाते करदर्शनम ॥ या आधुनिक सुभाषि...