धुंदी कळ्यांना
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. श्री जयराम भिडे ऋतू कोणता ही असो पहाटेचे फिरणे मी शक्यतो चुकवत नाही. असाच एक दिवस वाढलेल्या थंडीत फिरण्यास निघालो होतो. नेहमी फिरण्यास येणारा मित्र परिवार आता कमी झाला होता. त्यामुळे एकटाच फिरण्याचा आनंद घेत निघालो. वातावरणात सगळीकडे एक निरव शांतता होती. या शांततेत झाडे, पक्षी आणि प्राणी धुक्याची दुलई ओढून शांतपणे निसर्गाच्या कुशीत झोपले होते आणि माझ्या सारखा एखादा चालत होता निसर्गाच्या सान्निध्यात. याच विचारात फिरत असताना झाडावर बहरणाऱ्या झाडांच्या कळ्या, फुले वसंत ऋतूच्या आगमनाची जाणिव करुन देत होती हे सर्व पाहत असताना आपसूकच मनातले शब्द ओठांवरती आले "धुंदी कळ्यांना धुंदी फूलांना"..... या गीताचे शब्द मला कॉलेज जीवनात असताना झालेल्या सांस्कृतिक संस्काराची आठवण करून देत होते. त्या काळी कविवर्य जगदीश खेबुडकर "गावरान मेवा"... हा कार्यक्रम सादर क...