मुस्कान
मुस्कान दुपारी चारची वेळ. पुण्यातून एक मंगल कार्य आटपून रेल्वेने येण्याकरता पुणे स्टेशनकडे निघालो. सवयी प्रमाणे गाडीच्या वेळे आधी स्टेशन वर पोहचलो. पुणे स्टेशन माणसांनी गजबजून गेले होते. काकीनाडा एक्स्प्रेसच्या आरक्षित बोगीत येऊन बसलो. कधी न्हवे ते हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजाला अनुसरून हवेत प्रचंड उकाडा जाणवत होता. उकाड्याने हैराण झाल्याने कंपार्टमेंट मध्ये कोणीच कोणाशी बोलत न्हवते. खिडकीतून येणारा वारा गरमच होता पण तो सुद्धा उकाड्यात बरा वाटत होता. वारा आणि गाडीचा येणारा विशिष्ठ आवाज यामुळे हळू हळू बरेच जण पेंगू लागले. मला प्रवासात झोपण्याची सवय नसल्याने पेपर काढून वाचू लागलो. युक्रेन, हिजाब, सोमय्या आणि राऊत हे विषय सोडून काहीच न्हवते. पेपर मिटला व माझा आवडता छंद सुरू झाला माणसे वाचण्याचा. ...