माझ्या कथा.3 नावात काय असत
नावात काय असत जेवत असताना सहज एका भांड्यावर लक्ष गेले आणि भांड्यावरील नाव, तारीख दिसली. जवळ जवळ बेचाळीस वर्षापूर्वीची तारीख होती आणि .....यांच्या कडून सप्रेम भेट होते. ते वाचून बेचाळीस वर्षे फ्लॅशबॅक मध्ये गेलो. त्यावेळी झालेला कार्यक्रम ज्या व्यक्तीने भेट दिली त्याचा आठवणी असं डोक्यात चालू होत. तेव्हढ्यात प्रसिद्ध इंग्लिश लेखक शेक्सपियर यांचे वाक्य आठवले "नावात काय असत" याच विचारात सहजपणे मनात आले खरच नावात काय असत..म्हटल तर फक्त एक शब्द पण मनापासून विचार केलातर अनेक नाती, भावना, समाज यांना जोडणारा दुवा. नावात काय असत असे लीहताना शेक्सपियर एक तर कोणत्या भारतीयाला भेटला नसावा किव्हा भारतात आला तरी नसावा आम्हा भारतीयांना नावाबद्दल काय वाटते हा खरतर कादंबरीचा विषय. प्रत्येक भारतीयाला जन्मापासून बाराव्या दिवशी अनेक नावे मिळतात. एक आत्याने दिलेले, एक आई बाबांनी दिलेले ,एक जन्मनाव आणि नंतर मित्रपरिवाराने केलेले खास नामकरण..... टोपण नाव.... जे चिकट...