माझ्या कथा.3 नावात काय असत

 नावात काय असत

              जेवत असताना सहज एका भांड्यावर लक्ष गेले आणि भांड्यावरील नाव, तारीख दिसली.

जवळ जवळ बेचाळीस वर्षापूर्वीची तारीख होती आणि .....यांच्या कडून सप्रेम भेट होते. ते वाचून बेचाळीस वर्षे  फ्लॅशबॅक मध्ये गेलो. त्यावेळी झालेला कार्यक्रम ज्या व्यक्तीने भेट दिली त्याचा आठवणी असं डोक्यात चालू होत. तेव्हढ्यात प्रसिद्ध इंग्लिश लेखक शेक्सपियर यांचे वाक्य आठवले "नावात काय असत"  याच विचारात सहजपणे मनात आले खरच नावात काय असत..म्हटल तर फक्त एक शब्द पण मनापासून विचार केलातर अनेक नाती, भावना, समाज यांना जोडणारा दुवा. 

                नावात काय असत असे लीहताना शेक्सपियर एक तर कोणत्या भारतीयाला भेटला नसावा किव्हा भारतात  आला तरी नसावा आम्हा भारतीयांना नावाबद्दल काय वाटते हा खरतर कादंबरीचा विषय. प्रत्येक भारतीयाला जन्मापासून बाराव्या  दिवशी  अनेक नावे मिळतात.

एक आत्याने दिलेले, एक आई बाबांनी दिलेले ,एक जन्मनाव आणि नंतर मित्रपरिवाराने केलेले खास नामकरण..... टोपण नाव.... जे चिकटत ते कायमचंच.

                 भारतीय संस्कृतीत विवाहानंतर पतीपत्निनी एकमेकांचे काव्यात्मक रसिकतेने नाव उखण्यात घेण्याची परंपराच. जर एखाद्या नववधूला तिच्या "अहो" चे नाव घेण्यास सांगितले की भाषेची प्रतिभा तर दिसतेच. उखण्यात नाव घेताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव , मनात उठलेली स्पंदने त्यातून तयार होणारी ती "म्हणजे  हळुवार प्रेमच  जिवंत शिल्पच".कदाचित राजा रवी वर्मास पण चित्रात उतारावता आले  नसेल. आज ग्रामीण भागातील एखादी मावशी सुद्धा तेवढ्याच शालीनतेने नाव घेताना दिसते.

         

              छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव जरी उच्चारले तर प्रत्येक भारतीयाची छाती फुगून येते, त्याच बरोबर अंगातील रक्त सळसळते आणि माणूस कोणत्याही कामास तयार होतो. 

            अध्यात्म हा तर आम्हा भारतीयाचा खास पैलू. अध्यात्मात नामस्मरणचे महत्व अधोरेखित केले आहे. नामस्मरण हा ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग म्हणून वर्णन केला जातो. नाम किंवा नाव यांचा विचार केल्यास काही पैलू नव्याने उलगडतात. पंढरीची वारी त्यातील ज्ञांनबा तुकाराम  हा  नामचा जयघोष   तर वारीचा आत्माच. या नमघोषातून मिळणार्या समाधानात तल्लीन होणारा वारकरी पहिला की  'सुख म्हणजे नक्की काय असतं ' हे समजत  आणि याच देही याच डोळा अनुभवता येत. मुखी रामनाम रहावे या करिता मागील पिढीत मुलांची नावे सुद्धा देवांची. 

         असा हा नावाशी जोडलेला माणूस जेव्हा शेवटच्या प्रवासास निघतो ते सुद्धा आपलं नाव माग सोडून म्हणूनच आज हि नावात काय असत म्हणारा 

 शेक्सपियर लक्ष्यात राहतो तो नावानेच.


Comments

Popular posts from this blog

तुम बिन सात दिन

नाका

पराधीन आहे जगती