तुम बिन सात दिन

 तुम बिन सात दिन

*प्रा जयराम भिडे*


                   रविवार म्हणजे रिलॅक्स वारआज फिरण्यास दांडी मारत सकाळी निवांत उठलोसवयीप्रमाणे मोबाईल हातात घेऊन दिवसाची सुरवात झालीलहानपणी दिवस सुरू होई तो,

कराग्रे वसते लक्ष्मीः"या  सुभाषिताने

जसा जसा मोठा होत गेलो तशी सुभाषितांची जागा चित्रपटांच्या गाण्याने घेतलीआता तर गेल्यादहा वर्षात दिवसाची सुरवातआधुनिक सुभाषित कृतीत आणून होते.


कराग्रे वसते टच स्क्रीन

करमध्ये मोबाईल।

करमूले तु चार्जर

प्रभाते करदर्शनम 


 या आधुनिक सुभाषिताने.  

कराग्रे कामाला लावत मोबाईल बरोबर खेळत होतोतेवढ्यात  एका मित्राचा फोन आला.  फोन वरत्याने गडबडीत सांगितले तुला एका ठिकाणी भाषण देण्यास घेऊन जाणार आहेविषयठिकाणव्हॉट्सॲप केले ते बघ आणि तयारी कर म्हणून  फोन कट केला

        

                मित्राच्या आदेशा पुढे पर्याय नसल्याने व्हॉट्सॲप उघडून त्याची पोस्ट पाहिलीत्यानेदिलेल्या "digital detox"  विषयाचा माझा काही संबंध न्हवता.


                  तातडीने मित्राला फोन केला   विचारले अरे मी या विषयावर काय बोलणारत्याचेस्पष्टीकरण ऐकून उडालोचअरे  सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव या गावात या विषयावरप्रयोग केला आहेतू सांगलीचा आहेस  अलीकडे पेपर मध्ये "बरेलिहितोस म्हणून तुलासांगितले आहेअसे म्हणून फोन परत कट.  


               पेपर मध्ये लिखाण करण्यास सुरुवात केल्या पासून जरा मार्केट वाढले आहेयाचा अर्थ मीमोठा झालो असा जरासुद्धा नाहीफक्त एक स्वागताचा बुके देऊन बोलावणी येतात इतकेच.😃


          डिजिटल डिटॉक्स  बद्दल फारसे माहित न्हवते पण तो  चांगलाच  डोक्यात शिरून टॉक्सिकझाला होताया डीटॉक्स ने स्मार्टफोनचा वापर कमी करण्या ऐवजी वाढवण्यास सुरवात केली.


                 प्रथम गूगल भाऊंची मदत घेत अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलात्याच्या नुसार ज्याकालावधीत एखादी व्यक्ती इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की स्मार्टफोन किंवा संगणकवापरण्यापासून परावृत्त होते  त्यास भौतिक जगात तणाव कमी करण्याची किंवा सामाजिकपरस्पर संवादावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते.


               आता  एक गोष्ट लक्षात आली.  मोबाईलसंगणक सारख्या उपकरणांपासून लांब राहणे परस्पर संवाद वाढवणेहे फार सोपे आहे असे वाटून मी एक महिना मोबाईल पासून लांब राहण्याचा  निर्णय घेतला.


                   मोबाईल जरा दूर कपाटावर ठेऊन दिलाइकडे तिकडे काही काम काढत फिरू लागलो.  हात मात्र सवयीने सारखा खिश्यात मोबाईल शोधू लागलाकसा तरी अर्धा तास गेला असेलनजरसारखी मोबाईल कडे जाऊ लागलीजसे नवीन लग्न झाल्यावर बायको माहेरी गेली की वाटते तसेवाटू लागलेमन अस्थिर झाले होतेत्या अवस्थेत सहज  ओठावर गाणे आले.

"जाने जां ढूंढता 

फिर रहा हूँ तुम्हें रात दिन

मैं यहाँ से वहाँ....."

हे म्हणायला  मोबाईलची रिंग वाजायला एकच गाठ पडली.  फोन लगेच उचललातर फोन वर,  एकास दवाखान्यात दाखल केलेली बातमी मिळालीपरत फोनचे महत्त्व जाणवू लागले.


                     आता लक्षात आले महिना भर मोबाईल पासून लांब राहणे.. अवघडचमग सरकारीकामकाजा प्रमाणे एक महिन्याचे टार्गेट एका आठवड्यावर आणलेत्याच प्रमाणे नियम अटीशिथिलता आणली.

 1.फेसबुकव्हॉट्सॲप सारख्या  सोशल ॲपचा वापर पूर्ण बंद.

2.आपणहून कुणाला ही फोन  करणे.

3. कुणाचा फोन आल्यास घेणे.

    या नियमांना अधीन राहून  माझी सात दिवसांची डिजिटल डिटॉक्सची मानसिक तयारी सुरूझाली.


                    सोमवारी पहाटे मोबाईल  हेड फोन घरी ठेऊन फिरण्यास बाहेर पडलोबागेत बरीचगर्दी होतीत्या गर्दीत कुणाशीही सवांद  साधता अनेक 'कर्णपिशाच (हेड फोन लावलेली ) फिरत होतीकाही तर बोलता बोलता हातवारे करताना दिसत होतीजवळ जाऊन पाहतो तरलक्षात आले ती  फोन वरती संभाषण साधत होतीआता डिजिटल डिटॉक्स खऱ्या अर्थाने समजू लागले होते.परस्परातील हरवलेला सवांद जाणवला.  त्याच विचारात घरी आलो.


                     घरात शिरल्या शिरल्या  सवयीचा गुलाम असणारा मी सरळ मोबाईल कडे निघालोतेवढ्यात मनाने आठवण करून दिली don't touch...


                    मोबाईल वर फ्लॅश होणारी व्हॉट्सॲप , फेसबुकची नोटिफिकेशन लक्ष वेधून घेत होती जणू म्हणत होती,

"हमने तुमको देखा , 

तुमने हमको  देखा कैसे." 


                     मोह माया म्हणजे काय लक्षात येऊ लागलेडिजिटल मोह टाळत एका मागून एकदिवस घालवत होतोमार्च एंड मुळे येणारे  बँकाचे साधे  मेसेज पाहत होतो  एखादा येणारा फोनघेत होतोया काळात एक महत्वाची गोष्ट लक्षात आली ना मोबाईल बॅटरी  डाऊन होत होती,  नाडेटा संपत होता.


           गेले चारपाच  दिवसात व्हॉट्सॲप वर कोणती पोस्ट केली नाही  पाहिली ही नाहीबरेचदिवसात कोणती  पोस्ट नाही म्हणून एका मित्राचा फोन आला आणि प्रेमळ संवाद सुरू झाला.

"काय बे कडू खपलास का?" मेसेज नाहीपोस्टला उत्तर नाहीत्याच्या शब्दातून लक्षात आलेनुसत्या पोस्ट पेक्षा संवादातील भावना महत्वाच्या आणि हा संवाद प्रत्यक्षात असेल तर  सोने पेसुहागा.


                     डिजिटल डिटॉक्स करता धरलेल्या सात दिवस  उपवासाचा आज शेवटया सात दिवसात  अनेक अनुभव घेतले  जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागलोमनात प्रश्न उभा राहिला खरंचडिजिटल उपकरणेसोशल अॅप  अत्यावश्यक आहेतविचार करत असताना जाणवलेमेडिकल , प्रवासऑनलाईन आर्थिक व्यवहार या करता डिजिटल साधने तर लागतातच


                  काही मिस केलेल्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहिल्याजसे की माझे मित्र मिलनजी यांची सुमधुर गाण्याची पोस्टरणदिवे यांच्या मुळे रोज घडणारे तुळजाभवानीचे दर्शनअंजलीजीचे येणारे दैनिक पंचांगमित्रांच्या बरोबर होणारे जरा गमतीदार चॅटिंग आणि फेसबुक वर दिसणाऱ्यातोंडचे चंबू केलेल्या विचित्र सेल्फी😆 असे खूप काही.


                    सध्याच्या आधुनिक युगात डिजिटल उपकरणां शिवाय राहणे अशक्य आहेपरंतु याचायोग्य वापरठराविक काळा पुरता करत माणूस  समाज यातील संवाद प्रथम हे लक्षात ठेवणे गरजेचेया विचाराने मन शांत झाले  कधी झोपी गेलो ते कळलेच नाही

            तेव्हड्यात मोबाईल  डोळ्यापुढे येऊन "आजा आजा  मै हू प्यार तेरा"

या गाण्यावर नाचू लागलात्याच्या बरोबर duet करण्याकरिता उभा राहिलो आणि मोबाईलचा गजर  वाजलात्या आवाजाने जाग आली  मोबाईल बरोबरील डान्सचे स्वप्न भंगलेउठूनकिलकिल्या डोळ्यांनी पाहू लागलोपाहतो तर टेबल वरील मोबाईलचा गजर परत परत वाजून फिरण्यास जाण्याची आठवण करून देत होता

          

                 जणू सांगत होता मी  माझे डिजिटल कुटुंब  उपयोगाचे  आहोतफक्त तू ठरव आमचावापर किती आणि कसा करायचासंयमित वापरच  प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात डिजिटल डिटॉक्सघडवून आणेलयातूनच नात्यांना , विचारांना नवसंजीवनी मिळेल



डिजिटल साधनाने हरवू नका  संवाद.


सवांदातूनच वाढे नात्यातील  सहवास.


जरी असो जवळ वा दूर देशी  नाती.


धरुनी योग्य डिजिटल साधने हाती


जाणून घेऊ   नात्यानात्याची खबरबात.


डिजिटल विषाला आणू  नका   तनमनात.


म्हणुच हवा मध्येच डिजिटल  डीटॉक्स.

      

           🙌🌸🌸🙌


प्रा जयराम भिडे

09/4/23


Comments

Popular posts from this blog

नाका

पराधीन आहे जगती