माझ्या कथा 4.... सोनाबाई
सोनाबाई सन 1972 मध्ये महाराष्ट्राने फार भयानक दुष्काळ अनुभवला. या दुष्काळात संपूर्ण ग्रामीण जीवन ढवळून निघालं होत. गावातील घरंदाज घराणी सुद्धा मोडून पडली होती. प्रत्येक व्यक्ती आपले सामाजिक स्थान, संस्कार या मर्यादा पाळून जगण्यासाठी धडपड करत होता. दुष्काळी परिस्थितीच्या काळात गावामध्ये होणारे बदल भयावह होते. शेतीवाडी मध्ये कमी उत्पन्न, शेतातील पशुधन सांभाळणे हे तर जिकिरीचे(त्या काळात आज सारख्या चारा छावण्या सुरु झाल्या न्हवत्या) गावकरी स्वतः उपाशी राहत पण मुक्या प्राण्याची काळजी घेत. या परिस्थितीशी तोंड देण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत होते. त्या काळात विधानसभेचे सभापती वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून आलेल्या रोजगार हमी योजनेने ग्रामीण भागातील जनतेला थोडा दिलासा मिळाला होता.गरीब, श्रीमंत सर्वांनाच ही योजना तारक ठरलेली.बरेच जण रोजगार हमी योजनेवर कामावर जात. परंतु काही जण सामाजिक बंधनामुळे अशा कामावर जाऊ श...