Posts

Showing posts from December, 2021

नाका

 *नाका*             सकाळी सहजपणे लाँग ड्राईव्हला  बाहेर पडलो ते माझ्या आवडत्या रस्त्यावर.घराला लागून असणारा तुळजापूर महामार्ग जो अतिशय चांगला झाला आहे.अशा सुंदर रस्त्यावरून गाडी चालवणे खूपच आनंददायक.  पावसामुळे महामार्गाच्या दुतर्फा दिसणारी हिरवाई आणि डाव्या बाजूला  असणारे हिप्परगा जलाशयाचे  पाणी,हे सर्व वातावरण मनात जोश निर्माण करत होते. या जोशात गाडी चालवत असताना  स्पीडोमीटरने 100 चा  आकडा कधी गाठला ते कळलेच नाही. जवळ बसलेल्या सौ. ने वाढलेला वेग हळूच नजरेने सांगण्याचा प्रयत्न केला.  तिच्या इशाऱ्या कडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत  गाडी चालवत होतो.  वेगात जात असताना समोर उंचावर एक बोर्ड दिसला,टोल नाका" 500 मीटर ". बोर्ड दिसताच गाडीचा वेग कमी करत नक्याचा जवळ आलो . तेथील फास्टॅग रीडरने  फास्टॅगचे वाचन केले आणि पुढील स्वयंचलित  आडवा बार बाजूस झाला . गाडी टोल नाका ओलांडून पुढे निघाली.                       मनात विचार आला सौ. नजरेने स्पीड कमी करा स...