Posts

Showing posts from December, 2020

माझ्या कथा.. स्टँड/ थांबा

 स्टँड/ थांबा अचानक काही आठवणी, शब्द, गाणी, प्रसंग आपल्या मनात येतात, तेथेच रेंगाळतात आणि दिवसभर आपल्या भवती पिंगा घालत राहतात. आज दुपारी कॉलेजवरून येत असताना मागून कोणीतरी ओ सर, ओ सर , थाबा की. अशी हाक मारत असल्याचा जाणवले. मागे वळून बघत असता एक मुलगी हाक मारत होती तिला पाहून थांबलो. ती बारावी पास आऊट विद्यार्थिनी होती, भरभर चालतच जवळ आली आणि तिला बारावी नंतर मिळालेल्या कॉलेज प्रवेशाबद्दल आनंदने सांगत होती. तिच्याशी गप्पा मारत तिचे अभिनंदन करून घरी आलो. घरी आल्यावर चहा पीत गप्पा मारत असताना गप्पापेक्षा विद्यार्थिनी आणि तिने मारलेल्या हाकेतील थांबा शब्द माझ्या मनात होता. व्याकरणाच्या दृष्टीने थांबा शब्द नाम म्हणून वापरला जातो जसे बस थांबा( स्टॅण्ड) तर कधी क्रियापद, मित्रा थांब. ते व्याकरणाच्या दृष्टीने काही असेल पण माझ्या मनात हा शब्द आणि त्या विषयीच्या भावना खूप वेगळ्याच आहेत.  थांबा( क्रियापद) शब्द कानावर पडताच लगेचच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. ती व्यक्ती का हाक मारत असेल? काय काम असेल? काय ब्याद तर मागे लागणार नाही ना? असे एक का अनेक प्रश्न निर्माण करते. तेवढेच नाही...

माझ्या कथा 1..मास्क मुखवटा, माणूस

 मास्क. मुखवटा आणि माणूस बरेच दिवसांनी आज पहाटे कॉलनीच्या बाहेर फिरण्यास निघालो. नेहमी प्रमाणे पुणे हाइवे जवळील सर्व्हिस रोड वर फिरत असताना ओळखीचे चेहरे दिसतात का ते निरखून पाहू लागलो. किती प्रयत्न केले तरी चेहरे ओळखीचेच वाटेनात. अनेक व्यक्तीची तोंडे मास्कने झाकलेली दिसत होती. प्रत्येकाचे डोळे एकमेकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहात ओळख शोधण्याचा प्रयत्न करत होते. असाच चालत असताना मनामध्ये अनेक विचारांची गर्दी होऊ लागली आणि पाहिलेल्या मास्कची रूपे डोळ्यापुढे सरकू लागली. आमच्या गावात जैन साध्वी, मुनी येत त्यांच्या तोंडावर पांढरी मुखपट्टी असे ती सभ्यता, संस्कृती आणि बंधने याचे प्रतीक होते. दवाखान्यातील डॉक्टर,नर्सेस, वॉर्ड बॉय यांच्या चेहऱ्यावरील हिरव्या रंगाचा मास्क, सुरक्षा आणि कर्तव्याची जाणिव करुन देतो. विज्ञान प्रयोगशाळेतील N 95 मास्क शास्त्रज्ञांच आणि प्रयोगाच्या संरक्षणाचे काम करतो. बुरखा धार्मिकतेच्या नावाखाली स्त्रियांच्यावर लादलेली बंधने अधोरेखित करतो. आज काल तरुण मुलींच्यात पॉप्युलर असणारा मास्क प्रकार म्हणज...