Posts

Showing posts from April, 2021

पराधीन आहे जगती

  पराधीन आहे जगती ......                    करोना आणि मृत्यू हे आज कालच समीकरणच होत चालले आहे. आज सकाळी एका स्वामींची निधन वार्ता आली.त्यावर चर्चा चालू असतानाच एक काकू सहज बोलून गेल्या स्वामी असून असा मृत्यू का?  या वाक्याने विचारचक्र सुरू झाले आणि  सहजपणे एका गाण्याचे शब्द आठवले.....         "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा"                      गीत रामायण मधील या गीतात ग. दी. मा. नी किती उत्कट आणि अर्थपूर्ण शब्दात रामायणातील श्रीराम आणि भरत या दोन बंधूतील सवांद दहा कडव्यात शब्दबध्द केला आहे. तो काव्यमय प्रवास फक्त त्यांच्या पुरता न राहता समस्त मानव जातीस लागू होतो आणि मानवी जन्माचा पटच उलगडत  जातो. सामान्य माणूस असो,  संत असो की देवाचा मानवी अवतार  एकदा माणूस म्हणून जन्म घेतला की कर्मामुळे मिळणारी फळे भोगाविच लागतात.                            कर्मसिध्दांत हा आपल्या...